Posts
वाचू या , शिकू या...
- Get link
- X
- Other Apps
शाळेत प्रवेश घेतलेलं प्रत्येक मूल हे परिसरातून , त्याच्या सभोवतालच्या वातावरणातून काहीतरी शिकून आलेलाच असतो. त्याच्या परिसरातील प्राणी , पक्षी , झाडे , फळे , फुले ,खाण्याच्या वस्तू , खेळणी , बाजार , जत्रा तसेच टी. व्ही. वर पाहिलेले काही कार्यक्रम जसे - मोटू पतलू , छोटा भीम , कार्टून्स , इ. माध्यमातून तो शाळेत आलेला असतो . मुलाकडे शब्दसाठा भरपूर प्रमाणात असतो ..... त्याला जोड द्यायची असते फक्त मार्गदर्शनाची वा दिग्दर्शनाची . यामुळे ते मूल शाळेत रमेल . त्यांस खेळणे खूप खूप आवडते ; म्हणून तीही संधी उपलब्ध करून दिली पाहिजे . मग ते मूल नक्कीच चित्र ओळख , खेळ , कृतीयुक्त गीत ,नकला , छोटासा संवाद यातून ते मूल बोलायला लागेल .